www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास आजपासून महागलाय. या ट्रेन्समध्ये कॅटरिंगचे दर दोन टक्क्यांवरुन चार टक्क्यांवर वाढवण्यात आले आहेत. कॅटरिंगमधले हे दर जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल केल्यामुळं आलाय. या गाड्यांच्या भाड्यामध्ये खाण्याची दरांचाही समावेश असतो.
प्रिमियर सर्विसच्या प्रवाशांसाठी मागील १० दिवसांमध्ये हा दुसरा झटका आहे. रेल्वेनं नुकतीच आपल्या तिकीट दरांमध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली. सात ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू झाले. आता पुन्हा वाढलेल्या दरांचे पैसे प्रवाशांना १७ ऑक्टोबरनंतर रेल्वेतच द्यावे लागतील.
राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसमधील जेवणात चॉकलेट, टॉफी आणि फ्रूट ज्यूस यांचा समावेश करण्यात आलेला नाही. सकाळ-संध्याकाळच्या चहाचे दर ३० ते ४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. मात्र नाश्ता, दुपारचं आणि रात्रीच्या जेवणाच्या दरांमध्ये ५० ते ६० टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.