राजकोट : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गुजरातमधील राजकोटमधून तब्बल 1.15 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहनातून या नोटा बदलण्यासाठी नेल्या जात होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1.15 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा ताब्यात घेण्यात आल्या.
याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीये. याची माहिती आयकर खात्याला देण्यात आली असून ते पुढील तपास कऱणार आहेत. सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर विविध ठिकाणी अशी कारवाई करण्यात येतेय. तसेच अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात रक्कम ताब्यात घेण्यात आलीये.
Rajkot police seize 1.15 crore cash (old Rs 500 and 1000 notes) from a four wheeler. Three persons have been arrested. pic.twitter.com/gMzMLm8Dum
— ANI (@ANI_news) November 20, 2016