प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण

रुग्णाकडे प्लेट नसल्यामुळे त्याला जमिनीवरच जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार झारखंडच्या रांचीमध्ये घडला आहे.

Updated: Sep 24, 2016, 04:24 PM IST
प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण  title=

रांची : रुग्णाकडे प्लेट नसल्यामुळे त्याला जमिनीवरच जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार झारखंडच्या रांचीमध्ये घडला आहे. हात मोडल्यामुळे पालमती देवी या रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

रुग्णालय कर्मचाऱ्यांची मुजोरी एवढ्यातच थांबली नाही तर जेवणाआधी पालमती देवींना जमीनही स्वच्छ करायला लावली. पालमती देवींना जमिनीवरच डाळ आणि भातही वाढण्यात आला. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश रुग्णालयाच्या संचालकांनी दिले आहेत.