'त्या' मुलाखतीसाठी बलात्कारी मुकेश सिंहला ४०,००० मिळाले होते?

नवी दिल्लीतील 'निर्भया बलात्कार' प्रकरणातील फाशीची शिक्षा मिळालेल्या एका दोषीला मुलाखतीसाठी ४० हजार रुपये मोजण्यात आले होते, अशी माहिती एका वृत्तसंस्थेनं उघड केलीय. 

Updated: Mar 6, 2015, 10:47 AM IST
'त्या' मुलाखतीसाठी बलात्कारी मुकेश सिंहला ४०,००० मिळाले होते? title=

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील 'निर्भया बलात्कार' प्रकरणातील फाशीची शिक्षा मिळालेल्या एका दोषीला मुलाखतीसाठी ४० हजार रुपये मोजण्यात आले होते, अशी माहिती एका वृत्तसंस्थेनं उघड केलीय. 

तिहार तुरुंगातील सूत्रांच्या हवाल्यानं, निर्भया बलात्कार प्रकरणावर डॉक्युमेंट्री बनवणाऱ्या लेज्ली उडविनच्या कंपनीनं दोषी मुकेश सिंहला या मुलाखतीसाठी हे पैसे मोजले होते. तिहार जेलच्या चौकशीत ही गोष्ट समोर आलीय. तिहार जेलकडून बीबीसी, लेज्ली उडविन आणि को - प्रोड्युसर अंजली भूषण यांना नोटीस देण्यात आल्यात. 

तिहारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ साली कैदी मुकेश सिंह याची मुखाखत घेण्यासाठी लेज्ली उडविन हीनं अनेक प्रयत्न केले होते. यासाठी 'खुल्लर' नावाच्या एका इसमानंही तिची मदत केल्याचं समजतंय. सुरुवातील त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळालं नाही. परंतु, काही दिवसांतच या कंपनीनं गृह मंत्रालय आणि तिहार जेलचे डीजी विमला मेहरा यांची परवानगी मिळवली. 

इतकंच नाही तर, आरोपी मुकेश सिंहनं या मुलाखतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. पण, हीच रक्कम खूप मोठी असल्याचं लेज्लीच्या कंपनीनं आरोपींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजावलं. त्यानंतर ४० हजार रुपयांत सेटलमेंट झाली. 

कंपनीनं काही पैसे कैदी मुकेश सिंहच्या प्रिजनर प्रॉपर्टी अकाऊंटमध्ये (कैद्यांच्या खात्यात) जमा केले होते, अशी माहिती मिळतेय. परंतु, तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या बातमीला दुजोरा दिलेला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.