किरण बेदींना हरवणाऱ्या एसके बग्गा यांची ओळख

 कृष्णानगर विधानसभा मतदार संघातून किरण बेदी यांचा पराभव झाला आहे. आम आदर्मी पार्टीचे एसके बग्गा यांनी किरण बेदींचा २ हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. 

Updated: Feb 10, 2015, 03:06 PM IST
किरण बेदींना हरवणाऱ्या एसके बग्गा यांची ओळख title=

नवी दिल्ली :  कृष्णानगर विधानसभा मतदार संघातून किरण बेदी यांचा पराभव झाला आहे. आम आदर्मी पार्टीचे एसके बग्गा यांनी किरण बेदींचा २ हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. 

भाजपच्या दिल्ली मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला हरवणाऱ्या एसके बग्गा यांची काय वैशिष्ठ्ये आहेत.

१) साठी पार केलेले बग्गा व्यवसायाने वकील आहेत, पण सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखिल ते सक्रिय आहेत.

२) बग्गा यांनी भाजपचा बालेकिल्ला कृष्ण नगरमधून विजय मिळवला आहे, आपल्या विजयामागील रहस्य सांगतांना बग्गा म्हणतात, किरण बेदी या बाहेरच्या उमेदवार होत्या.

३) बग्गा हे अण्णा हजारेंच्या नेतृत्वात जे आंदोलन झालं त्यात मोठ्या प्रमाणात ते सक्रीय होते. या आधी ते काँग्रेस कार्यकर्ता होते, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते आपमध्ये सहभागी झाले होते.

४) बग्गा हे १९९३ पासून कृष्णा नगरच्या भगवान श्रीराम चंद्र दसरा धार्मिक कमेटीचे अध्यक्ष होते. ही समिती गरीब आणि गरजू , मतिमंद मुलांसाठी मोठं काम करते.

५) बग्गा आम आदर्मी पार्टीमध्ये एक लहान व्यावसायिक वर्गाचा आवाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी व्यावसायिकांसाठी वॅटला सामान्यपणे लागू करण्याचा एक फॉर्मेट तयार केला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.