स्टेट बँकचं पर्सनल लोन होमलोनच्या व्याजदराने

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देण्याच्या प्रयत्नात आहे. कस्टमर्सला पर्सनल, टॉप अप लोनवरही तेवढंच व्याज लावलं जाणार आहे, जेवढं ते होमलोनवर देत आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी बँक समजल्या या बँकेची ही ऑफर मर्यादीत काळापर्यंतच आहे.

Updated: Mar 12, 2015, 02:09 PM IST
स्टेट बँकचं पर्सनल लोन होमलोनच्या व्याजदराने   title=

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देण्याच्या प्रयत्नात आहे. कस्टमर्सला पर्सनल, टॉप अप लोनवरही तेवढंच व्याज लावलं जाणार आहे, जेवढं ते होमलोनवर देत आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी बँक समजल्या या बँकेची ही ऑफर मर्यादीत काळापर्यंतच आहे.

या घोषणेनुसार एसबीआयचा होमलोन कस्टमर १०.१५ टक्क्यांनी पर्सनल लोन घेऊ शकतो, मात्र त्याने होमलोनचे हफ्ते वेळेवर भरलेले असणे आवश्यक आहे. महिलांसाठी हा रेट तर आणखी कमी म्हणजे १०.१० टक्के एवढाच आहे.

एसबीआयकडून सध्या टॉप अप लोनवर ०.३५ ते ०.४० टक्के व्याज घेण्यात येतं, तर पर्सनल लोनवर दुसऱ्या कस्टमर्सकडून १३.५० ते १८.५० पर्यंत व्याज घेण्यात येतं.

एसबीआयच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, बँकेची लोन ग्रोथ वाढवण्यासाठी टॉप अप लोनवरील रेट कमी केला आहे.  बँक या ऑफरच्या माध्यमातून चांगलं ट्रॅक रेकॉर्ड असणाऱ्या ग्राहकांना फायदा देण्याच्या तयारीत आहे, यामुळे हे कस्टमर दुसऱ्या बँकेकडे जाणार नाहीत.

रिझर्व्ह बँकेने या वर्षी रेपो रेट दरात दोन वेळेस कपात केली आहे, कमी व्याज दराचा ट्रेंड येण्याचे संकेत दिले आहेत. मात्र आरबीआयने व्याजदर कमी केल्यानंतरही बँकांनी कोणतेही व्याजदर कमी केलेले नाहीत. अर्थखात्याने देखिल त्यांना व्याजदर कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बँकांनी यावर म्हटलं आहे की, सध्या कर्जाची मागणी फार कमी आहे, यामुळे या रेटचा बॅलेन्स शीटवर वाईट परिणाम होऊ शकतो,  बहुतांश बँकांचा बेस रेट सध्या १० ते १०.२५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. बँक यापेक्षा कमी व्याजदरावर कोणत्याही ग्राहकाला कर्ज देऊ शकत नाहीत.

एसबीआयने म्हटलंय की आता लोन प्रोसेसिंग फी देखिल घेतली जाणार नाही, ही ऑफर काही काळापर्यंत आहे, बँकेचे पुढील आर्थिक वर्षातील योजना टॉप अप लोनवर सध्याच्या कस्टमर्सकडून १०.५ टक्क्याने व्याज वसुली करण्याची आहे.

एखादी महिला कस्टमर बँकेतून ५० लाख रूपयांचं टॉप अप लोन १०.१० पर्सेट घेऊ शकते, कस्टमरचं जेवढ्या वर्षांचं होमलोन बाकी आहे, तेवढ्यावर हे टॉप अप आहे. ५० लाख ते २ कोटींच्या टॉप अप लोनवरील व्याज १०.७५ टक्के आणि २ कोटी पासून ५ कोटी रूपयेपर्यंतच्या कर्जाला ११.२५ टक्के असणार आहे. यामुळे एसबीआयला लोन ग्रोथ करण्यास मदत होणार असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.