वाळू माफियांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

वाळू माफियांवर केलेल्या धडक कारवाईमुळं नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरलेले  आयएएस अधिकारी डी. के. रवी यांचा मृतदेह बंगळुरुमधील त्यांच्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आलाय. 

Updated: Mar 17, 2015, 12:36 PM IST
वाळू माफियांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू  title=

बंगळुरू : वाळू माफियांवर केलेल्या धडक कारवाईमुळं नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरलेले  आयएएस अधिकारी डी. के. रवी यांचा मृतदेह बंगळुरुमधील त्यांच्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आलाय. 

प्राथमिक तपासानुसार रवी यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलीस वर्तवलाय. मात्र, रवी यांच्या मृत्यूबाबात घातपाताचा संशय व्यक्त होतोय. 

३५ वर्षीय रवी सध्या व्यापारी कर विभागात सहआयुक्तपदी कार्यरत होते. रवी यांच्या पत्नीने मोबाईलवरून अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही उत्तर न आल्याने त्या घरी आल्या. त्यावेळी रवी यांनी पंख्याला गळफास लावून घेतल्याच्या स्थितीत त्यांना आढळले.

पोलिसांनी याप्रकरणी रवी यांचे खासगी सचिव आणि वाहनचालकाचा जबाब नोंदवून घेतलाय. या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही पोलिसांकडून तपासलं जातंय. रवी यांनी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट न ठेवल्यानं आत्महत्येबाबत संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

रवी यांनी कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील वाळू माफियांविरुद्ध जोरदार कारवाई केली होती. पोलिस आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत. रवी कर्नाटक कॅडरचे २००९ बॅचचे अधिकारी होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.