GSTचा मार्ग मोकळा, काँग्रेसनं दिला पाठिंबा

जीएसटी विधेयक पारित होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण काँग्रेसनं जीएसटी विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय. 

Updated: May 5, 2015, 05:02 PM IST
GSTचा मार्ग मोकळा, काँग्रेसनं दिला पाठिंबा title=

नवी दिल्ली: जीएसटी विधेयक पारित होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण काँग्रेसनं जीएसटी विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय. 

काँग्रेस नेते विरप्पा मोईलींनी लोकसभेत जीएसटी विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं जीएसटी विधेयक मंजूर होण्याचा मार्ग प्रशस्त झालाय. तत्पूर्वी बीजू जनता दलानं जीएसटी विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती. त्याला काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. 

मात्र लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी धुकडावून लावली होती. त्यानंतर बीजेडीनं स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मागे घेतला. तर काँग्रेस विधेयकाला पाठिंबा दिलाय. सरकारचा 1 एप्रिल 2016 ला देशात जीएसटी लागू करण्याचा मानस आहे. त्यामुळं विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याला सरकारनं तिलांजली दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.