काँग्रेसच्या २५ खासदारांचे लोकसभेतून निलंबन

लोकसभा सभापतींनी काँग्रेसच्या २५ खासदारांना ५ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. संसदेच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अडथळा आणल्याने ही निलंबन करण्यात आलं आहे.

Updated: Aug 3, 2015, 05:36 PM IST
काँग्रेसच्या २५ खासदारांचे लोकसभेतून निलंबन title=

नवी दिल्ली : लोकसभा सभापतींनी काँग्रेसच्या २५ खासदारांना ५ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. संसदेच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अडथळा आणल्याने ही निलंबन करण्यात आलं आहे.

सुमित्रा महाजन यांनी हा निलंबनाचा आदेश काढला, यावर महाजन म्हणाल्या,  "तुम्ही पुन्हा-पुन्हा सभागृहाच्या मधोमध येऊन गोंधळ घालतात, यामुळे कामकाजाला अडथडा होतोय."

महाजन यांनी सर्व काँग्रेस खासदारांचं नाव घेऊन सांगितलं की, जर त्यांनी या वागण्यात बदल केला नाही, तर भविष्यात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर काँग्रेस खासदारांनी याचा विरोध केला आहे, आणि 'तानाशाही नहीं चलेगी' अशी घोषणाबाजी केली.

याआधी काँग्रेस खासदारांनी आयपीएलची माजी कमिश्नर ललित मोदी यांची मदत केल्याच्या आरोपावरून परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचा राजीनामा मागितला. तसेच राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आणि संसदेत फळक झळकावले.

काँग्रेस खासदारांनी व्यापमं घोटाळा प्रकरणी,  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या देखील राजीनाम्याची केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.