नवी दिल्ली : नुकतंच एका लग्नात पाहुणे म्हणून सहभागी झालेल्या सुब्रह्मण्यम स्वामींनी काही वेळेसाठी उपस्थितांना अवाक् करून सोडलं... स्वामींनी या लग्नात असं काही केलं की, सगळेच उपस्थित काही काळासाठी स्तब्ध झाले... आणि नंतर मात्र एकच हशा पिकला.
तामिळनाडूमध्ये एका लग्न समारंभात नवरा-नवरीला आशिर्वाद देण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी दाखल झाले होते... यावेळी, स्वामींना नवऱ्या मुलाच्या हातात देण्यासाठी मंगळसूत्र देण्यात आलं... आणि त्यानंतर जे झालं ते पाहण्यासारखंच होतं...
व्हिडिओ पाहा :-
गोंधळलेले स्वामी हातात घेतलेलं मंगळसूत्र नवऱ्या मुलाच्या हातात न देता सरळ वधूच्याच गळ्यात बांधायला निघाले...
तात्काळ यावेळी, जवळच उभ्या असलेल्या एका महिलेनं स्वामींना थांबवलं... दोन क्षण काहीच न कळल्यामुळे भांबावलेल्या स्वामींनी आपली चूक लक्षात येताच जीभ चावली... आणि मग त्यांनी ते मंगळसूत्र नवऱ्या मुलाच्या हाती दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.