पेट्रोलच्या किंमतीपेक्षा 'कर' महाग

आतंरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे भाव कमी होत असले, तरी पेट्रोलचे दर हवे तेवढे कमी होण्यास तयार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सतत घसरण सुरू आहे. केंद्र सरकारने त्यानंतर वित्तीय तूट कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. 

Updated: Jan 21, 2015, 11:54 PM IST
पेट्रोलच्या किंमतीपेक्षा 'कर' महाग title=

नवी दिल्ली : आतंरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे भाव कमी होत असले, तरी पेट्रोलचे दर हवे तेवढे कमी होण्यास तयार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सतत घसरण सुरू आहे. केंद्र सरकारने त्यानंतर वित्तीय तूट कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर पोचले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट होईल, अशी चर्चा होती. मात्र, सरकारने उत्पादन शुल्कात वाढ करून सर्वसामान्यांच्या तोंडचा घास पळवला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोलच्या उत्पादन शुल्कामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

नोव्हेंबरपासून सलग तिसऱ्यांदा सरकारने उत्पादन शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरातून दिलासा मिळणार नसल्याचे सध्या तरी दिसते आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली असली तरी सरकारने उत्पादन शुल्क, विक्रेत्याचे कमिशन यामुळे सध्या पेट्रोल मूळ किंमतीपेक्षा त्यावरील एकूण कर प्रति लिटर 39 पैशांनी जास्त झाला आहे. 

सरकारने पेट्रोल प्रति लिटर 2 रुपये 42 पैसे तर डिझेल 2 रुपये 25 पैशांनी स्वस्त केले होते. कमी झालेले दर शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले होते. पण, यावेळी सरकार आणि तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर कमी करतेवेळी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबरोबर नेहमीप्रमाणे देण्यात येणारी उत्पादन शुल्क दराबाबत आणि व्हॅटचा तपशील  दिलेला नाही. 

यात मूळ किंमतीपेक्षा जास्त कर जास्त असल्याने ही माहिती सार्वजनिक केली नसल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. 'परंतु  आता पेट्रोल नियंत्रणमुक्त झाले आहे. त्यामुळे किंमती आणि करासंबंधित तपशील सार्वजनिक करण्याची गरज नाही', असे इंडियन ऑईलचे  कॉर्पोरेट संवादाचे कार्यकारी संचालक कपूर यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.