जालियनवाला बाग - लेह पॅलेसचाही जिर्णोद्धार होणार

भारतातील 'हेरिटेज' अर्थात पुरातत्व वास्तूंचं जतन करण्याच्या दृष्टीने सरकारनं 2015-16च्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या तरतूदी केल्यात. 

Updated: Feb 28, 2015, 02:21 PM IST
जालियनवाला बाग - लेह पॅलेसचाही जिर्णोद्धार होणार

नवी दिल्ली : भारतातील 'हेरिटेज' अर्थात पुरातत्व वास्तूंचं जतन करण्याच्या दृष्टीने सरकारनं 2015-16च्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या तरतूदी केल्यात. 

मुंबईतील एलिफंटा लेणीसह भारतातील 25 वर्ल्ड हेरिटेज स्थळांच्या सुधारणांवर भर देणार असल्याचं अरुण जेटली यांनी सांगितलंय. 

स्थळांचा जिर्णोद्धार, माहिती फलक, पार्किंग व्यवस्था, अपंग व्यक्तींसाठी सोई-सुविधा पुरविणे, सुरक्षा आणि टॉयलेटससारख्या पायाभूत सुविधा पुरविणे अशा सुविधा या सर्व ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

यावेळी, वाराणसी, हैदराबाद आणि अमृतसरच्या ठिकाणांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्यात येईल, असंही जेटली यांनी जाहीर केलंय. यामध्ये, अमृतसरमधील इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जालियनवाला बागेचाही समावेश आहे. 

देशातील पर्यटनक्षेत्राला वाव देण्यासाठी 150 देशांना 'व्हिजा ऑन अरायव्हल' उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.    
   
या हेरिटेजचा होणार जिर्णोद्धार...

  • जुन्या गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेन्टस्

  • कर्नाटकातील हम्पी

  • कुंभालगड आणि राजस्थानमधील इतर पहाडी किल्ले   

  • रानी की वाव, पतन, गुजरात

  • लेह पॅलेस, लडाख, जम्मू-काश्मीर

  • वाराणसी टेम्पल टाऊन, उत्तरप्रदेश

  • जालियनवाला बाग, अमृतसर, पंजाब

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x