बिहार निवडणुकांनंतर मोदी सरकारचा नागरिकांना झटका

बिहार निवडणुका संपल्यानंतर लगेचच मोदी सरकारनं पेट्रोल - डिझेलच्या एक्साइज ड्युटीमध्ये वाढ करून नागरिकांना चांगलाच झटका दिलाय. 

Updated: Nov 7, 2015, 08:37 AM IST
बिहार निवडणुकांनंतर मोदी सरकारचा नागरिकांना झटका title=

नवी दिल्ली : बिहार निवडणुका संपल्यानंतर लगेचच मोदी सरकारनं पेट्रोल - डिझेलच्या एक्साइज ड्युटीमध्ये वाढ करून नागरिकांना चांगलाच झटका दिलाय. 

 केंद्र सरकारनं आपलं बजेटचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त महसूल गोळा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे, आता पेट्रोल - डिझेलवरची एक्साइज ड्युटीमध्ये वाढ करण्याचा पर्याय सरकारनं निवडलाय. 

अधिक वाचा - सर्वांसाठी बॅड न्यूज, दिवाळीनंतर सर्वांचे 'दिवाळं'

एक्साइज ड्युटीमध्ये वाढ झाल्यामुळे अर्थातच पेट्रोल आणि डिजेलच्या किंमतीतही वाढ होणार आहे. पेट्रोलवर 1.6 रुपये तर डिझेलवर 40 पैसे प्रति लिटर एक्साइज ड्युटी वाढवण्यात आलीय.

शुक्रवारी रात्रीपासून हे नवे दर लागू होतील. तर गैर ब्रान्डेड किंवा सामान्य पेट्रोलवर बेसिक एक्साइज ड्युटी 5.46 वरून 7.06 रुपये प्रति लीटर वाढवण्यात आलीय. अतिरिक्त आणि विशेष एक्साइज ड्युटीचा समावेश केल्यानंतर पेट्रोलवरची एकूण लेवी 19.06 रुपये प्रति लीटर होणार आहे (ही लेवी 17.46 रुपये प्रति लीटर होती) 

अधिक वाचा - सोन्याच्या खरेदीचा आणखी एक पर्याय...

तर ब्रान्डेड पेट्रोलवर एक्साइज ड्युटी 6.64 रुपये प्रति लीटरवरून 8.24 रुपये प्रति लीटर करण्यात आलीय. 

तसंच, गैर ब्रान्डेड किंवा सामान्य डिझेलवर एक्साइज ड्युटी 426 रुपये प्रति लीटरवरून 4.66 रुपये प्रति लीटर करण्यात आलीय. 

अधिक वाचा - आता, रेल्वे तिकीट रद्द केलं तर भोगा आपल्या कर्माची फळं...

विशेष आणि अतिरिक्त एक्साइज ड्युटी अगोदरप्रमाणेच 12 रुपये प्रति लीटर राहील. ब्रान्डेड डिझेलवर एक्साइज ड्युटी 6.62 रुपयांवरून 7.02 रुपये प्रति लीटर करण्यात आलीय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.