नवी दिल्ली : असे पहिल्यांदा झाले आहे की दहशतवाद्यांचे मृतदेहांना ठेवण्यात आले नाही तर त्यांचा त्वरीत दफनविधी करण्यात आला. हा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला.
दहशतवाद्यांच्या मृतदेहांना बराच काळ ठेवणे त्यांच्या धर्माच्या विरुद्ध आहे. त्यामुळे उरीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे त्वरीत दफन करण्यात आले.
मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते, त्यामुळे त्यांचे दफन करणे गरजेचे होते. डॉक्टरांनी सांगितले की मृतदेहांना ठेवणे शक्य नव्हते. यापूर्वी दहशतवाद्यांचे मृतदेह अनेक महिने ठेवले जात होते. त्यांच्या कुटुंबियांची वाट पाहिली जात होती. पण यंदा जम्मू काश्मिरात परिस्थिती वेगळी होती.