नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री वेंकैय्या नायडू यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, सरकारला युद्ध नको आहे पण जो युद्ध करेल त्याला आम्ही सोडणार नाही. नायडू यांच्या या वक्तव्यानंतर लक्षात येईल की भारत-पाकिस्तान संबंध किती तणावात आहेत.
पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर दुसरीकडे आपल्याच देशातील नेते प्रश्न विचारत आहेत. यावर नायडू यांनी म्हटलं की, काही लोकं कधीत समाधानी होत नाही. काही लोकं विरोधात असतात... काही लोकं अशी असतात जी प्रत्येक गोष्टीत शंका उपस्थित करतात.
नायडू यांनी पुढे म्हटलं की, DGMO यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्जिकल स्ट्राइकची माहिती दिली आहे. यापेक्षा अधिक काही सांगणं हे देश हिताचं नाही आणि यावर चर्चा करणं म्हणजे लष्कराचा अपमान करण्या सारखं आहे. पाकिस्तानला काहीतरी म्हणायचंय म्हणून तो बोलतोय. ते त्यांच्या लोकांवर अंतिम संस्कार नाही करु इच्छीत.