नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामी उपदेशक झाकिर नाईक यांच्या भाषण, लेखन आणि इतर प्रसारक साहित्याच्या चौकशीचे आदेश दिलेत.
यानंतर इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष झाकिर नाईक यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आलेला दिसतोय. या व्हिडिओत झाकिर नाईक महिलांची छेडछाड आणि बलात्कारसारख्या घटनांवर भाष्य करताना दिसतायत. इतकंच नाही तर यावर त्यांनी उपायही सुचवलाय.
नाईक यांच्यावर नुकताच बांग्लादेशच्या दहशतवादी हल्ल्यांना प्रेरणा मिळाल्याचा आरोप केला जातोय. मुंबईत जन्मलेल्या आणि इथंच राहणाऱ्या ५० वर्षीय झाकिर नाईक हे सध्या इस्लामचा प्रचार करताना दिसतात.