व्हिडिओ : ‘त्यानं’ मित्राला मरणाच्या दारातून परत आणलं

कानपूरमध्ये एका माकडानं आपल्या साथीदाराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची कशाप्रकारे पराकाष्टा याची दृष्यं समोर आलीत. कानपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली होती.

Updated: Dec 21, 2014, 09:17 AM IST
व्हिडिओ : ‘त्यानं’ मित्राला मरणाच्या दारातून परत आणलं title=

कानपूर : कानपूरमध्ये एका माकडानं आपल्या साथीदाराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची कशाप्रकारे पराकाष्टा याची दृष्यं समोर आलीत. कानपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली होती.

२५,००० हजार व्होल्टच्या विद्युत तारांशी एका माकडाचा संपर्क झाला आणि त्याला जोरदार वीजेचा धक्का बसला... त्यामुळं हे माकड मरणासन्न अवस्थेत होतं. त्याचवेळी त्याचे दोन साथीदार तिथं आले. एकानं आपल्या जखमी साथीदाराला तोंडात उचललं... त्याला हलवलं... त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. एखाद्या डॉक्टरप्रमाणे आपल्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी हे माकड प्रयत्नांची शिकस्त करत होतं. तरीही जखमी माकड शुद्धीवर येईना.

त्यानंतर या माकडानं जखमी माकडाची छाती दाबण्यास सुरुवात केली.... तरीही त्याला यश आलं नाही... त्यावेळी या माकडानं आपल्या दातांनी जखमी माकडाच्या डोळ्याच्या वरचा भाग दाबण्यास सुरुवात केली आणि त्याला पाण्यात फेकलं... एकदा दोनदा त्यानं जखमी माकडाला पाण्यात टाकलं... तेव्हा त्याच्या प्रयत्नांना यश आलं... आणि जखमी माकड हालचाल करु लागलं.

जखमी साथीदाराला मग या माकडानं नाल्यात फेकलं आणि त्याच्या प्रयत्नांना यश आलं... जखमी माकड पूर्णतः शुद्धीवर आलं... त्याचे प्राण वाचले... ही दृष्यं पाहून स्टेशन परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला... 

या माकडानं जखमी साथीदाराचा जीव वाचवत उपस्थितांना ‘माणुसकी’चं अनोखं दर्शन घडवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतेय. 

व्हिडिओ पाहा - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.