कबाली पाहून येणाऱ्या तरुणाने वाचवली तरुणीची इज्जत

रजनीकांतच्या 'कबाली' सिनेमाने सध्या अनेकांवर जादू केली आहे. चेन्नईमध्ये मात्र एका खऱ्या-खुऱ्या कबालीने एका मुलीची अब्रु वाचवली आहे. एक मॉडल कबाली सिनेमा पाहून परत घरी निघाली होती. तेव्हा एका निर्जन स्थळी काही जणांनी या तरुणीला अडवलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यानच रजनीकांतचा एक फॅन वसंत पॉल सिनेमापाहून घरी निघाला होता आणि त्याला या तरुणीचा आवाज ऐकू आला.

Updated: Jul 25, 2016, 02:39 PM IST
कबाली पाहून येणाऱ्या तरुणाने वाचवली तरुणीची इज्जत title=

चेन्नई : रजनीकांतच्या 'कबाली' सिनेमाने सध्या अनेकांवर जादू केली आहे. चेन्नईमध्ये मात्र एका खऱ्या-खुऱ्या कबालीने एका मुलीची अब्रु वाचवली आहे. एक मॉडल कबाली सिनेमा पाहून परत घरी निघाली होती. तेव्हा एका निर्जन स्थळी काही जणांनी या तरुणीला अडवलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यानच रजनीकांतचा एक फॅन वसंत पॉल सिनेमापाहून घरी निघाला होता आणि त्याला या तरुणीचा आवाज ऐकू आला.

वसंतने ही घटना आपल्या फेसबूक पेजवर एका फोटोसह शेअर केली आहे. याफोटोमध्ये मानेवर असलेली जखम दिसत आहे.
वसंतने म्हटलं आहे की, माझ्या शरिरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. पण मला याचा गर्व आहे. मी मित्रांसोबत कबाली सिनेमाचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिला आणि त्यानंतर पुन्हा घरी निघालो होतो. तेव्हा अचानक मागे रस्त्यावर एका मुलीचा मदतीसाठी आवाज ऐकू आला. मी लगेचच तेथे गेलो तर तेथे ३ मुलं होती. ते साऊथचे नव्हते. त्यांचं बोलणं हे वेगळंच होतं. 

त्यामध्ये एकासोबत माझी मारामारी झाली आणि २ मुलं हे त्यामुलीचे कपडे फाडत होते. त्यानंतर एकाने मागून दोरीने गळा दाबला आणि स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात माझ्या मानेला दुखापत झाली. यादरम्यान त्या तरुणीला देखील पळण्याची संधी मिळाली आणि एका रिक्षावाल्याची नजर आमच्यावर पडली. तर तो ही आमच्या बचावासाठी धावला. त्याने त्या मुलांची खूप धुलाई केली त्यानंतर ती मुलं तेथून पळून गेलीत. त्यादरम्यान मला श्वास घेण्यात मदत झाली.

वसंतने लिहिलं आहे की, या घटनेदरम्यान अर्धातास त्याच्या जवळ कोणताही पोलीसवाला आला नाही. त्यानंतर पोलिसांनी याची तक्रार देखील नोंदवली नाही. त्यानंतर त्याने म्हटलं की, तुम्ही एकटे असलात तरी कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी घाबरु नका. तुम्ही बरोबर आहात तर प्रत्येकजण तुमची मदत करायला येईल.