www.24taas.com, बगदाद
कुख्यात आतंकवादी संघटना अल कायदाने अमेरिका, इस्त्राइल आणि फ्रांसमध्ये उत्पात माजवण्यासाठी आत्मघाती हल्लेखोरांचं प्रमाण वाढवायला सुरूवात केली आहे. यासाठी इच्छुक हल्लेखोरांनी संपर्क साधावा यासाठी इंटरनेटवर जाहिराती दिल्या आहेत.
कित्येक जिहादी संघटनाच्या वेबसाइटवर याच प्रकारच्या जाहिराती प्रसारित करण्यात आल्या आहेत. अल-फिदा, शमौख अल-इस्लाम, अरौर होनेन यांसारख्या जिहादी संस्थांनी आपल्या जाहिराती ठळकपणे दिलेल्या आहेत. या जाहिरातंमध्ये लोकांना आपल्या संघटनेतील स्वयंसेवकांना इ-मेलद्वारे आपला कार्यानुभव आणि कशा प्रकारच्या विध्वंसाची इच्छा आहे, हे पाठवण्याची सूचना केली आहे.
यमन येथे कार्यरत असणाऱ्या अल-कायदा आपल्या जाहिरातींमधून प्रचार करताना कुठलाही छुपा अजेंडा न राबवता धडधडीतपणे आपला उद्देश सांगितला आहे. या जाहिरातीत असंही लिहिलं आहे, “इस्लामच्या शत्रूंची हत्या करत असणाऱ्या आपल्या बांधवांबरोबर काम करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी हा उपक्रम चालू आहे.”