कॉनकोर्डियाच्या कॅप्टनला २५०० वर्षांची शिक्षा ?

इटालियन क्रुझ कोस्टा कॉनकॉर्डियाचा कॅप्टन फ्रान्सेस्को शेट्टिनो याला एकूण २५०० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

Updated: Feb 8, 2012, 07:54 AM IST

www.24taas.com,लंडन

 

 

इटालियन क्रुझ कोस्टा कॉनकोर्डियाचा कॅप्टन फ्रान्सेस्को शेट्टिनो याला एकूण २५०० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. इटालियन किनारपट्टी नजीक क्रुझ निष्काळजीपणे खडकावर आदळलवल्याचा तसंच जहाज सोडून पळ काढल्याचा आणि सदोष मनुष्यवधाच्या अनेक गुन्ह्यांखाली दोषी ठरवल्यास शेट्टिनोला २५०० वर्षांची शिक्षा होऊ शकते.

 

इटालियन वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार शेट्टिनोला कुझवरील ३०० प्रवाशांसाठी प्रत्येकी प्रवाशासाठी आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. इटालियन किनारपट्टीजवळ असलेल्या गिगिलो बेटावर १३ जानेवारीच्या रात्री शेट्टिनोच्या बेजबाबदारपणामुळे जहाज खडकावर आदळून बुडालं होतं. शेट्टिनोने लाईफबोटीतून पळ काढला आणि किनारपट्टीवर बसून प्रवाशांच्या सुरक्षित स्थळी स्थलांतरित होताना पाहिलं.

 

क्रुझ बुडाल्याप्रकरणी दहा वर्षांची आणि मनुष्यवधाखाली दोषी ठरल्यास आणखी १५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते. शेट्टिनो देश सोडून पळून जाण्याची तसंच खटला सुरु झाल्यानंतर पुराव्यात हस्तक्षेप करण्याची शक्यता सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे. शेट्टिनोचा बचाव करणाऱ्या वकिलांनी त्याची नजर कैदेतुन सुटका करुन त्याला जामीन देण्यात यावा अशी विनंती केली आहे.