बेरोजगारीत होणार वाढ

२०१२ मध्ये जवळजवळ ७.५ करोड तरुण बेरोजगार राहतील, असं ‘आंतरराष्ट्रीय श्रम संगठन’नं (आयएलओ) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.

Updated: May 23, 2012, 01:21 PM IST

www.24taas.com, जिनिव्हा

 

२०१२ मध्ये जवळजवळ ७.५ करोड तरुण बेरोजगार राहतील, असं आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं (आयएलओ) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.

 

वर्ष २०१२मधील आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगाराचे बदलेले ट्रेन्ड पाहता यंदा, १५ ते २४ वर्षांच्या जगभरातले जवळजवळ १२.७ टक्के युवक बेरोजगार राहू शकतात. वर्ष २००७ पेक्षा ही संख्या ४० लाखांहून अधिक आहे.

 

सुत्रांच्या माहितीनुसार, ही संख्येत आणखीन भर पडू शकते, कारण ६४ लाखांपेक्षा जास्त युवकांनी रोजगार शोधणंच बंद केलंय. दिवसेंदिवस खालावत चाललेली बाजाराची स्थिती पाहून अशा युवकांना आपलं शिक्षण चालू ठेवणं, हा पर्याय समोर दिसतोय. आणि या स्थितीत २०१६ पर्यंत बदल होण्याची शक्यता जरा कमीच आहे.