www.24taas.com, इस्लामबाद
अलकायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेने पाकिस्तानसाठीच्या म्होरक्याची निवड केली आहे. फरमान अली शिनवारी असे त्याचे नाव असून तो खैबर या आदिवासी भागात वास्तव्यास आहे. तसेच त्याचे भाऊ जम्मू आणि काश्मीर भागात दहशतवादी कारवाया करीत असल्याची माहिती आहे.
अलकायदाने एक परिपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या वृत्तपत्राने आपल्या सूत्रांचा हवाला देत हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अलकायदाच्या वरिष्ठ म्होरक्यांशी सल्लामलत करून शिनवारी यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिनवारी याला पाकिस्तानच्या आदिवासी भागाची संपूर्ण माहिती आहे. तसेच त्याचे अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेल्या अलकायदा कमांडर बदर मसूद यांच्याशीही चांगले संबंध होते. त्यामुळे त्याची निव़ड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.