शंभरीतल्या तरूणीनं जिंकली पोहण्याची स्पर्धा

ऐन तारुण्यात अनेकांची पोहताही येत नाही, किंवा पोहतांना दमछाक होते. जर सांगितले की एका १०० वर्षांच्या आजींनी पोहण्याची स्पर्धा जिंकली आहे, तर भुवया उंचावतील ना!

Updated: Apr 7, 2015, 05:58 PM IST
शंभरीतल्या तरूणीनं जिंकली पोहण्याची स्पर्धा title=

टोकियो : ऐन तारुण्यात अनेकांची पोहताही येत नाही, किंवा पोहतांना दमछाक होते. जर सांगितले की एका १०० वर्षांच्या आजींनी पोहण्याची स्पर्धा जिंकली आहे, तर भुवया उंचावतील ना!

पण हे खरं आहे.

जपानच्या मिको नागाओका या १०० वर्षीय महिलेने १५०० मीटर पोहण्याची स्पर्धा १५ मिनिटे आणि ५४.३९ सेकंदात पूर्ण केली आणि स्पर्धासुद्धा जिंकली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिको या वयाच्या ८२ व्या वर्षी पोहायला शिकल्या होत्या. गुडघे दुखी कमी व्हावी म्हणून त्या पोहण्यासाठी जात असत. त्यानंतर हळूहळू पोहण्यात रुची वाढत जाऊन त्या नियमित पोहू लागल्या.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.