अमेरीकन `आई`ने केले सात बालकांचे `खून`

अमेरीका मधील उटाह राज्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने गेल्या दहा वर्षांत आपल्याच सात नवजात बालकांना ठार मारल्याची समोर आली आहे.

Updated: Apr 14, 2014, 06:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरीका मधील उटाह राज्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने गेल्या दहा वर्षांत आपल्याच सात नवजात बालकांना ठार मारल्याची समोर आली आहे. मेगन हंट्समॅन (वय 39) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वॉशिंग्टन पोलिसांनी मेगनला अटक केली आहे.
आपल्या गॅरेजमधील गॅरेज बॉक्समध्ये मेगनने सातही बालकांचे मृतदेह वेगवेगळे ठेवले होते. मेगनच्या पहिल्या पतीने याबाबतही माहिती पोलिसांना दिली. चौकशीत मेनन हिने 1996 ते 2006 या काळात हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेगनचे पहिले पती गॅरेजची साफ सफाई करत असताना, त्यांना हे मृतदेह आढळले. बॉक्सची तपासणी केल्यावर त्यात बालकांचे मृतदेह असल्याचे आढळून आले. मेगनच्या गॅरेजची तपासणी केल्यानंतर हि सर्व मुले मेगनचीच असल्याचे स्पष्ट झाले.
बालकांच्या खूना प्रकरणी मेगनवर गुन्हा दाखल केला आहे. पण मेगनने हे कृत्य कोणत्या कारणामुळे केले हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच मेगनच्या पतीवरही संशय असल्याने त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.