पॅरिस हल्ल्यानंतर 'इसिस'नं घेतलाय 'अॅनोनिमस'शी पंगा!

 फ्रान्सवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 'इसिस' या दहशतवादी संघटनेनं अनपेक्षितरित्या स्वत:साठी आणखी एक शत्रू निर्माण केलाय

Updated: Nov 28, 2015, 11:03 AM IST
पॅरिस हल्ल्यानंतर 'इसिस'नं घेतलाय 'अॅनोनिमस'शी पंगा!  title=

पॅरिस : फ्रान्सवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 'इसिस' या दहशतवादी संघटनेनं अनपेक्षितरित्या स्वत:साठी आणखी एक शत्रू निर्माण केलाय. एका हॅकर्सच्या ग्रुपनं दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी टेक्नोलॉजिचा आधार घ्यायचा निर्णय घेतलाय.

काही अज्ञात व्यक्तींनी दहशतवाद्यांविरुद्ध लढून या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं म्हटलंय. या संबधीचा या ग्रुपनं एक व्हिडिओही प्रसिद्ध केलाय. पॅरिसवर केल्या गेलेल्या हल्लाच्या दोन दिवसानंतर हा व्हिडिओ यु-ट्यूब पाहायला मिळाला. 'पॅरिसवर केला गेलेला हल्ला आम्ही कधीही विसरू शकणार नाही, यांचा बदला आम्ही नक्की घेऊ' असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय. 

'अॅनोनिमस' म्हणजे 'अज्ञात' या नावाने प्रसिद्ध असलेला फ्रान्समधील हॅकर्सचा एक समूह आहे. आतापर्यंत अनेक सरकारी आणि खाजगी कपंन्याच्या वेबसाईट हॅक केल्याप्रकरणी 'अॅनोनिमस'वर सायबर गुन्हांची नोंद आहे. 

'अॅनोनिमस'चा हा व्हिडिओ आत्तापर्यंत जगभरातील लाखो लोकांनी पाहिल

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.