वॉशिंग्टन : इराक आणि सिरिया क्षेत्रात कार्यरत असलेला खलिफा शासनचा नेता अबु बकर अल बगदादीच्या अटकेची माहिती देणाऱ्याला एक कोटी अमेरिकी डॉलर बक्षिसदेण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अल बगदादीवर हे बक्षीस 2011 मध्ये घोषित केले आहे.
विदेशी मंत्रालयाने सांगितले की, ऑक्टोबर 2011 पासून रिवार्डस फॉर जस्टिस प्रोग्रामला त्यांनी आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहे आणि अतिरेकी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड द लॅवेन्ट (आयएसआयएल)चा नेता अबू बकर अल बगदादी विषयी कोणीही माहिती दिल्यावर एक कोटी डॉलरच्या बक्षिसांचा प्रस्ताव मांडला आहे. ज्या माहितीने त्याच्या ठिकाणाची माहिती समजेल, अटक करता येईल किंवा दोषी ठरवता येईल.
अल बगदादीच्या नेतृत्त्वमध्ये आयएसआयएलचे जहाल मतवादी जूनपासून इराकमधील उत्तर आणि पश्चिम भागातील मोठ्या प्रमाणावर काही भाग लपून बसले आहेत. यात अबु बकर अल बगदादी आहे. त्याला पकडण्यासाठी बक्षिस जाहीर केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.