'बीएमडब्ल्यूच्या सीईओंची बॅटरी संपली?'

जर्मनीची लग्झरी कार कंपनी बीएमडब्ल्यूचे नवे सीईओ हेरॉल्ड क्रूएगर यांची मंगळवारी स्टेजवर पायांत पाय अडखळला त्यामुळे त्यांची सर्वांदेखत चांगलीच फजिती झाली. यावर ब्रिटनच्या एका वेबसाईटनं खोडसाळपणा करत 'बीएमडब्ल्यूच्या सीईओंची बॅटरी संपली?' असं म्हटलंय.

Updated: Sep 15, 2015, 06:02 PM IST
'बीएमडब्ल्यूच्या सीईओंची बॅटरी संपली?' title=

फ्रँकफर्ट : जर्मनीची लग्झरी कार कंपनी बीएमडब्ल्यूचे नवे सीईओ हेरॉल्ड क्रूएगर यांची मंगळवारी स्टेजवर पायांत पाय अडखळला त्यामुळे त्यांची सर्वांदेखत चांगलीच फजिती झाली. यावर ब्रिटनच्या एका वेबसाईटनं खोडसाळपणा करत 'बीएमडब्ल्यूच्या सीईओंची बॅटरी संपली?' असं म्हटलंय.

त्याचं झालं असं की, नुकतीच बीएमडब्ल्यू या कंपनीची एक नवी कोरी शानदार कार लॉन्च करण्यात आली. या कार लॉन्चिंग कार्यक्रमासाठी कंपनीचे सीईओ हेरॉल्ड फ्रँकफर्ट स्टेजवर उपस्थित होते. 

अधिक वाचा - महिंद्राची दमदार कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'टीयूव्ही ३००' लॉन्च!

यावेळी, अचानक 49 वर्षीय हेरॉल्ड यांचा तोल गेला आणि ते मंचावरच पडले. त्यांनी उठण्याचा प्रयत्नही केला. यादरम्यान दोघांनी त्यांना आधार देत उठण्यासाठी मदत केली आणि नंतर हेरॉल्ड यांना घेऊन ते स्टेजवरून मागच्या बाजुला गेले. त्यानंतर अचानक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. 

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, हेरॉल्ड यांना अचानक चक्कर आली होती. मंगळवारी परदेश दौऱ्यावरून या कार्यक्रमासाठी दाखल झालेल्या हेरॉल्ड यांनी सकाळपासूनच बरं वाटत नव्हतं. पण, कार्यक्रमादरम्यान त्यांची तब्येत बिघडली. आता ते ठिक आहेत. 

उल्लेखनीय म्हणजे, मे महिन्यात बीएमडब्ल्यूची सूत्रं आपल्या हातात घेण्याऱ्या हेरॉल्ड यांचा फ्रँकफर्ट मोटार शोमध्ये हा पहिलीच एन्ट्री होती. या ऑटो शोमध्ये 1000 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.