व्हिडिओ : बॉम्ब निकामी करताना स्फोट, अधिकारी ठार

इजिप्तच्या काहिराहून एक धक्का देणारा व्हिडिओ समोर आलाय. एका पेट्रोल स्टेशनच्या बाहेर बॉम्ब डिफ्युज करताना झालेल्या स्फोटात एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या चिंधड्या उडाल्या... आणि हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. 

Updated: Jan 8, 2015, 05:31 PM IST
व्हिडिओ : बॉम्ब निकामी करताना स्फोट, अधिकारी ठार title=

काहिरा : इजिप्तच्या काहिराहून एक धक्का देणारा व्हिडिओ समोर आलाय. एका पेट्रोल स्टेशनच्या बाहेर बॉम्ब डिफ्युज करताना झालेल्या स्फोटात एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या चिंधड्या उडाल्या... आणि हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. 

एका वेबसाईटवर हा भयानक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. एक बॉम्ब डिफ्युज करत असातना काही लोक आपल्या मोबाईलवर हा व्हिडिओ तयार करत होते... इतकंच नाही तर, बॉम्बस्फोटानंतरही व्हिडिओ सुरूच राहिला... 

वेबसाईट डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत तीन इतर पोलीस कर्मचारी जखमी झालेत. या घटनेची जबाबदारी 'अंजद मिस्र' नावाच्या एका दहशतवादी संघटनेनं ट्विटरवरून स्वीकारलीय. 
 
 व्हि़डिओ पाहा :-   
  

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.