आंतरराष्ट्रीय दहा बातम्या एका क्लिकवर

Reuters | Updated: Sep 4, 2015, 11:20 PM IST
आंतरराष्ट्रीय दहा बातम्या एका क्लिकवर title=

ISISचे दहशतवादी अधिक वाईट 

सिडनी : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबॉट यांनी म्हटलय की ISISचे दहशतवादी अधिक वाईट आहेत कारण आपण केलेल्या पापांचीदेखील ते शेखी मिरवतात. अमेरिकेच्या आग्रहानंतर इराक आणि सीरियामध्ये ऑस्ट्रेलियाई हवाई हल्ल्यांना वेग देण्याचा विचारही ऑस्ट्रेलिया करत आहेत. 

गीताचा मार्ग बिकट
पाकिस्तानमध्ये गेल्या 13 वर्षांपासून वास्तव्यास असलेली 23 वर्षांची भारतीय मुलगी गीता सध्या भारतात येऊ शकणार नाही. सिंध हाय कोर्टानं हरियाणाची सामाजित कार्यकर्ती मोमिनीन मलिकची याचिका फेटाळून लावत गातीला भारतात पाठवण्यास नकार दिलाय. गीताला आश्रय दिलेली ईधी फाऊंडेशनच्यानुसार दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी दखल घेतल्यानंतरच गीताला भारतात पाठवलं जाऊ शकतं.

चीनमध्ये दुसऱ्या महायुद्धाचा विजय साजरा
दुस-या महायुद्धातील विजयाच्या 70 वी वर्षपूर्ती चीनमध्ये साजरी केली जात आहे. बीजिंगमधील ऐतिहासिक तियानमेन स्क्वेअर इथं चीन आपल्या सैन्य दलांची ताकत दाखवेल. दरम्यान यावेळी राष्ट्रपती शीन जिनपिंग यांनी सैन्यामधील 3 लाख सैनिक कमी करण्याची घोषणा केलीय. 

चीन आणि रशिया संबंध मजबूत
बीजिंगमधील सैन्य दलांच्या परेडनंतर राष्ट्रपती जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच रशिया आणि चानच्या नौदलांनी प्रशांत महासागरात युद्धाभ्यास केला होता. 

पाकमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी
पाकिस्तानामध्ये भारतीय चित्रपटांनावर कायमस्वरुपी बंदी लादण्यात येणार नाही. बॉलिवुड चित्रपटांविरोधातील एक याचिका फेटाळून लावत लाहौर हायकोर्टानं याचिकाकर्त्याला सांस्कृतिक मंत्रालयाशी बातचीत करण्याचा सल्ला दिलाय. 

आजीने  दिला नातीला जन्म
अमेरिकेमध्ये एका 51 वर्षांच्या महिलेनं आपल्या नातीला जन्म दिलाय ! नॉर्थ डकोटा इथं शेरी डिक्सन आपल्या मुलीसाठी सरोगेट आई बनली. वयाच्या 51वर्षी आई बनण्याचा तिनं कधी विचार केला नव्हता. मात्र आपली मुलीचं पहिलं बाळ मृत पावल्यामुळे शेरी डिक्सननं हा निर्णय घेतला.

ब्रेकिंग न्यूजला ट्विटरला पसंती
एका सर्वेनुसार ब्रेकिंग न्यूजबाबत माइक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर सर्वात प्रमुख सोशल मीडिया ठरलीय. ट्विटर वापरणारे 86टक्के नागरिक बातम्यांसाठी ट्विटर वर सक्रिय असतात. 

जगाने तो फोटो पाहिला अन्...
तुर्कीच्या समुद्र किना-यावर तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर युरोपवर शराणार्थींबाबत नरम भूमिका घेण्याबाबत दबाव वाढत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन सीरियाच्या हजारो शरणार्थींना इंग्लंडमध्ये येण्याची परवानगी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

युरोपमध्ये शरणागर्तींमध्ये वाढ
युरोपमध्ये शरण येणा-यांच्या संख्येत वाढ होत आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये 6 लाख नागरिकांनी युरोपमध्ये शरण येण्यासाठी अर्ज दाखल केलेत. तर गेल्यावर्षी चार लाख नागरिकांनी शरणागतीसाठी अर्ज दाखल केला होता. 

युक्रेनची राजधानी काळवंडली
युक्रेनची राजधानी किव आजकाल धुरानं घेरली गेलीय. कारण शहराच्या आसपास अनेक जंगलांना आग लागलीय. आत्तापर्यंत 30 हेक्टर परिसरात आग पसरलेली असून या आगीमुळेच शहरात धूर पसरलेला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.