पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरिफांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

 पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरला  गुरूवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हवामान खराब असल्यामुळे हे लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Updated: Dec 8, 2016, 05:23 PM IST
पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरिफांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग  title=

इस्लामाबाद :  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरला  गुरूवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हवामान खराब असल्यामुळे हे लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरने इस्लामाबादहून उड्डाण घेतले आणि ते मुजफ्फराबाद येथे जात होते. रस्त्यात हवामान खराब झाल्याने मुर्री येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. 

दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाले होते. यात असलेल्या ४७ लोकांचा मृत्यू झाला होता.