इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण

अलेक्झांड्रिया येथून कैरोच्य दिशेने जाणाऱ्या इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्याचे वृत्त आहे. अपहरणकर्त्यांकडे शस्त्र असल्याचीही माहिती मिळतेय. 

Updated: Mar 29, 2016, 12:24 PM IST
इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण title=

कैरो : अलेक्झांड्रिया येथून कैरोच्य दिशेने जाणाऱ्या इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्याचे वृत्त आहे. अपहरणकर्त्यांकडे शस्त्र असल्याचीही माहिती मिळतेय. 

या विमानावा सायप्रस येथे उतरवण्यात आले आहे. विमानात ५५ प्रवाली तसेच ७ क्रू मेंबर्स असल्याचीही खबर आहे. 

फ्लाइट MS181 हे विमान अलेक्झांड्रिया येथून कैरोच्या दिशेने निघाले होते. सकाळी साडे आठच्या सुमारास सायप्रसच्या लरनाका विमानतळाच्या कंट्रोल रुमला इमर्जन्सी लँडिगबाबत मेसेज मिळाला आणि ८ वाजून ५० मिनिटांनी या विमानाते ईमर्जन्सी लँडिग करण्यात आले. अद्याप याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.