23 वर्षीय तरुणी बनली ‘इसिस’ची ट्विटर स्टार

जेनिफर विल्यम्स... टेक्सास प्रांतातील ही 23 वर्षीय परदेशी धोरण संशोधक तरुणी सध्या भलतीच चर्चेत आलीय. ती ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी तिला घातलेल्या लग्नाच्या मागणीमुळे...

Updated: Oct 6, 2014, 02:48 PM IST
23 वर्षीय तरुणी बनली ‘इसिस’ची ट्विटर स्टार title=

टेक्सास : जेनिफर विल्यम्स... टेक्सास प्रांतातील ही 23 वर्षीय परदेशी धोरण संशोधक तरुणी सध्या भलतीच चर्चेत आलीय. ती ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी तिला घातलेल्या लग्नाच्या मागणीमुळे...

आपण धर्मपरिवर्तन करीत इस्लाम धर्माचा स्वीकार करत असल्याचं जेनिफरनं सोशल वेबसाईट ट्विटरवर जाहीर केलं होतं. तेव्हापासून तिनं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वळवलंय. यामध्ये, काही ‘इसिस’च्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. 

‘सॉरी... दहशतावाद समजून घेण्यासाठी मी कुराण वाचलं पण शेवटी धर्मपरिवर्तनावर येऊन पोहचले...’ असं जेनिफरनं 23 सप्टेंबर 2014 रोजी ट्विटरवर म्हटलं होतं. पण, तिचे बहुतेक फॉलोअर्स मुस्लिम असल्यामुळे ती आता पेचात सापडलीय. 

‘माझ्या या ट्विटनंतर एका मुलानं मी हिजाबमध्ये कशी छान दिसेल हे सांगितलं तर दुसऱ्या एकानं मला लग्नासाठीच मागणी घातलीय’, असं जेनिफरनं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. जेनिफरनं केलेल्या ट्विटवरून ती 'इसिस'ला सपोर्ट करते, असा काहींचा समज झाला होता... पण, यानंतर मात्र तीनं आपण धर्मांतर केलं असलं तरी 'इसिस' मात्र आपला अजिबात पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.