ISIS च्या वासनांधतेची सीमा केली पार, १२ वर्षीय चिमुरडीवर अनेकांचा रेप

  दहशतवादी संघटना आयसीसच्या वासनांधतेचा आणि क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्याचे समोर आले आहे. एका ताज्या खुलाशात क्रुरता आणि मानवतेला काळीमा फासणारी माहिती समोर आली आहे.

Updated: Jan 19, 2016, 02:49 PM IST
ISIS च्या वासनांधतेची  सीमा केली पार, १२ वर्षीय  चिमुरडीवर अनेकांचा रेप title=

नवी दिल्ली :  दहशतवादी संघटना आयसीसच्या वासनांधतेचा आणि क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्याचे समोर आले आहे. एका ताज्या खुलाशात क्रुरता आणि मानवतेला काळीमा फासणारी माहिती समोर आली आहे.

इराकच्या उत्तर भागात २०१४ मध्ये सिंजार शहरात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने हल्ला करून  सुमारे ५००० हजार यहुदी महिलांना ताब्यात घेतले आणि त्यांना सेक्स गुलाम केले.


 
या महिलांपैकी काही अल्पवयीन मुली असून त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या संपूर्ण परिवाराची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांना सेक्स गुलाम म्हणून विकण्यात आले.  डेलीमेलमध्ये आलेल्या बातमीनुसार दहशतवाद्यांनी एका १२ वर्षाच्या मुलीवर कोणतीही दया न दाखवता अनेक जणांनी एकापाठोपाठ रेप केला.

मानवतेला लाजवेल असे अत्याचार या महिलांवर करण्यात आहे. त्यांच्या क्रूरपणे बलात्कार करण्यात आणि मरण यातना देण्यात आल्यात. यातील काही महिलांनी आयसिसच्या दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटण्यास यश मिळाले.

तर काही महिला आपल्या पोटात या क्रूर दहशतवाद्यांची बाळं घेऊन सुटून आल्या आहेत. या महिलांना अशा काही हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथा सांगितल्या. त्याने आत्माचा थरकाप होईल.

२१ वर्षीय मुलीची एक हेलावणारी कथा

२१ वर्षी यहदी मुलगी परला सिंजर आयसीसने हल्ला केला त्यावेळी आम्ही डोंगराळ भागात पळून गेलो.  पण त्या दहशतवाद्यांनी आम्हांला पकडून आणले.  गावात राहण्यास सांगितले. त्यांनी सांगितले आम्ही तुम्हांला सोडून देऊ. पण ते खोटं बोलले. त्यांनी आम्हांला सिरियात घेऊन गेले. माझ्यासोबत अजून ४०० महिला होत्या, असे एका पळून आलेल्या महिलेने सांगितले.

 
 मला ज्या माणसाने निवडले तो खूप रागीट होता. तो मला खूप मारायचा आणि गोळी मारण्याची धमकी द्यायचा. अनेक दिवस मला खायला दिले नाही.  
 
 १० महिन्यापर्यंत आयसीसच्या दहशतवाद्यांच्या तावडीत राहिलेल परला सिंजर म्हणाली, मला त्यानंतर साउदी अरबच्या एका वृध्दाला विकण्यात आले. त्याने माझ्यावर खूप अत्याचार केले. हा मालक माझ्यावर रोज रेप करत होता. रेप केल्यानंतर म्हणत होत की मी तुझ्यासोबत झोपून तुला मुसलमान बनवत आहे. आम्हांला खूप कमी खायला देण्यात येत होते, गुलामांना पोटभर जेवणाचे स्वातंत्र्य नाही, असेही तो मालक सांगत होता.

 
 त्यानंतर मला एका तजाकिस्तानच्या व्यक्तीने खरेदी केले. दोन महिन्यानंतर तो मरण पावला आणि माझा मालक बदलला. त्यानंतर मला विकले नाही,  गिफ्ट म्हणून देण्यात आले. माझा मालक प्रत्येक वेळी रेप केल्यावर माझे हात पाय बांधत होता आणि मला मारत होता. अत्याचार आणि हिंसेचा हा प्रकार रोज घडत होता. मी तीळतीळ करून जगत होती.
 
 परला म्हणाली, आम्हांला अनेक व्यक्तींसोबत एका शाळेत ठेवण्यात आले होते. त्यावेळी आमच्यावर इस्लाम कबूल करण्याचा दबाव टाकण्यात आला होता.