न्यू यॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रेडीट कार्ड एका रेस्तरांमध्ये चाललं नाही. तेव्हा बराक ओबामा यांना सुरूवातीला हे प्रकरण फसवणुकीचं वाटलं. मात्र या क्रेडीट कार्डचा ते नियमित वापर करत नसल्याने ते चाललं नसावं, असं ओबामा यांना वाटलंय.
यावर बराक ओबामा म्हणाले, मी कधी कधीच या कार्डचा वापर करतो, आणि मला वाटतंय की यामुळेच असं झालं असावं.
कुणी भरलं बिल?
बराक ओबामा यांना जेव्हा सॉरी, तुमचं क्रेडीट कार्ड काम करत नाहीय, असं सांगण्यात आलं, तेव्हा सौ.मिशेल ओबामा यांनी आपलं क्रेडीट कार्ड पुढे करून ओबामांचं क्रेडीट राखलं.
बराक ओबामा यांनी ही घडलेली घटना 'कंझ्युमर फायनान्सशियल प्रोटेक्शन ब्युरो' आणि सरकारसोबत राबवत असलेली एक योजनेच्या घोषणेवेळी सांगितली, ही योजना डेबिट धारकांच्या सुरक्षेसाठी आहे.
एक निष्कर्षानुसार अमेरिकेत १० कोटी लोकांसोबत 'ओळखीची चोरी' होण्याच्या घटना घडल्या आहेत.
बराक ओबामा आपल्या सोबत पैसे ठेवतात का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या सोबत कॅश ठेवतात की क्रेडीट कार्ड या सर्वांना पडलेला प्रश्न आहे, असं म्हटलं जातं की अनेकदा त्यांना रोख पैसे पाहण्यात आलंय, जुलै महिन्यात टेक्सासच्या एका रेस्तंरामध्ये त्यांनी ४०० डॉलरचं बिल क्रेडीट कार्डने भरलं होतं. अशी घटना एकदा अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्यासोबत देखिल झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.