वॉशिंग्टन : तुम्ही चित्रपट क्षेत्रातील बड्या हस्तींविषयी ऐकलं असेल, यासाठी ते जास्तच जास्त १० रूम बुक करत असतील असं आपण ऐकलं असेल, पण येथे २२२ रूम बुक करण्यात आले आहेत.
कारण सलमान जे सौदी अरबचे राजे आहेत, त्यांनी २२२ रूम्स बुक केल्याने ते जगभरात चर्चेत आले आहेत. सलमान वॉशिग्टंनमधील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये थांबले आहेत.
वॉशिंग्टन डीसीजवळील जॉर्जटाऊनजवळील फोर सिझन हॉटेलमध्ये लक्झरी कारची रांग लागलीय, सोन्याचं फर्निचर आणि पार्किंगच्या जागेवरही लाल कार्पेट टाकण्यात आलं आहे.
बादशहा सलमान या जागी फक्त तीन दिवस थांबणार आहेत, तरी देखील संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आलं आहे. हा राजा ७९ वर्षांचा आहे, पण त्यांच्या सांगण्यानुसार हॉटेलात काही बदल करण्यात आले आहेत.
हॉटेलच्या एका सूटचं दिवसभराचं भाडं २ हजार डॉलर म्हणजे १ लाख ३० हजार रूपये आहे. जानेवारीत सलमान यांचे सावत्र भाऊ अब्दुल्ला यांचं निधन झाल्यानंतर सलमान यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.