www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत. आज ते वॉशिंग्टनमध्ये पोहोचतील. त्यानंतर शुक्रवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्य़क्ष ओबामा यांच्या भेटीत अनेक प्रादेशिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
विशेष म्हणजे याच दौऱ्यात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचीही भेट होणार आहे. या भेटीबाबत नवाझ शरीफचं जास्त उत्सुक असल्याची माहिती आहे.
दोन्ही देशातला तणाव आणि काश्मिरच्या मुद्द्यावर या दोघांच्या भेटीत चर्चेची अपेक्षा आहे. या आठवड्यात ही भेट होणार आहे. मात्र मनमोहन शरीफ भेटी आधी मनमोहन ओबामा भेट होणार आहे. १९९९ नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मैत्रीला आलेली बाधा दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल म्हणून या भेटीकडे पाहात असल्याचं शरीफ म्हणालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.