मित्राच्या बायकोचा टॅटू छातीवर, तरुणाला अटक

एक व्यक्ती आपल्या मित्राच्या बायकोच्या इतक्या प्रेमात पडला की त्याने आपल्या छातीवर तिचा टॅटू गोंदवला. पण त्याचा हा वेडेपणा त्याला महागात पडला. पोलिसांनी या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केल्याची घटना नेपाळमध्ये घडली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 1, 2014, 04:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, काठमांडू
एक व्यक्ती आपल्या मित्राच्या बायकोच्या इतक्या प्रेमात पडला की त्याने आपल्या छातीवर तिचा टॅटू गोंदवला. पण त्याचा हा वेडेपणा त्याला महागात पडला. पोलिसांनी या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केल्याची घटना नेपाळमध्ये घडली.
अशा प्रकारे घडलेला हा पहिला प्रकार आहे. काठमांडूच्या कावरे जिल्ह्यातील कुमार केसी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अशा प्रकारे एखाद्या महिलेचा टॅटू छातीवर गोंदविण्यासंदर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नाही. देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकार उघडकीस आला आहे.
कुमार केसीने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षापूर्वी महिलेच्या पतीने त्याची महिलेशी ओळख करून दिली होती. तेव्हा पहिल्या नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. त्याने दावा केले की, पहिल्या भेटीतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, महिलेने कुमारला आपला मित्र असल्याचे सांगितले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.