पाकिस्तानी मंत्र्याकडून संसदेतच महिला खासदारावर असभ्य टिप्पणी

पाकिस्तानचा आणखी एक नवा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानात आता महिला खासदारही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पाकिस्तानी संसदेत एका महिला खासदाराशी एका मंत्र्याने असभ्य वर्तन केले आहे. याबाबत जगभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान, मला न्याय न मिळाल्यास अंगावर पेट्रोल ओतून संसदेसमोरच आत्मदहन करण्याचा इशारा या पीडित महिला खासदार यांनी दिलाय.

AP | Updated: Jan 26, 2017, 07:14 AM IST
पाकिस्तानी मंत्र्याकडून संसदेतच महिला खासदारावर असभ्य टिप्पणी
Pic courtesy: www.facebook.com/nusratsahar.official

लाहोर : पाकिस्तानचा आणखी एक नवा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानात आता महिला खासदारही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पाकिस्तानी संसदेत एका महिला खासदाराशी एका मंत्र्याने असभ्य वर्तन केले आहे. याबाबत जगभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान, मला न्याय न मिळाल्यास अंगावर पेट्रोल ओतून संसदेसमोरच आत्मदहन करण्याचा इशारा या पीडित महिला खासदार यांनी दिलाय.

पाक संसदेत सर्वांसमक्ष एका मंत्र्याने महिला खासदारावर असभ्य भाषेत टिप्पणी करून त्यांच्यासमोर अपमानजनक प्रस्ताव ठेवला. खासदार महिलेने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतल्यानंतर संबंधित मंत्र्याने माफी मागितली आहे. दरम्यान, या प्रकरामुळे पाकिस्तानात महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही, अशी व्यथा पीडित खासदार महिलेने बोलताना मांडली.

पाहा व्हिडिओ : (Courtesy - www.facebook.com/nusratsahar.official):