वॉर्सा : मृत म्हणून घोषीत करण्यात आलेल्या महिलेला शवगृहात ठेवण्यात आले. पण ९१ वर्षांच्या या आजी तब्बल ११ तासांनी कोल्डहाऊस असलेल्या त्या शवगृहातून पुन्हा घरी परतल्या आणि अनेकांना धडकीच भरली. पोलंडच्या पूर्वेला असणाऱ्या लुबेल्स्की भागात ही घटना घडली.
जानिना कोल्केविच असे या वृद्ध महिलेचं नाव असून फॅमिली डॉक्टरने एका परीक्षणानंतर तिला मृत घोषित केलं होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कोल्केविच यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. शिवाय हृदयाचे ठोकेही चुकीचे पडत होते, त्यावेळी त्यांच्या भाचीने डॉक्टरांना बोलावलं. त्यावेळी परीक्षण करून त्यांना मृत घोषीत करण्यात आले. एवढेच नाही त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही बनविण्यात आले.
पण जेव्हा त्या ११ तासांनंतर घरी परतल्या तेव्हा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर विसलावा जेज म्हणाले, "मला धक्काच बसला आहे. काय झालं हे कळलंच नाही. त्यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते, श्वासोच्छवास थांबला होता, या वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शवगृहाच्या कोल्डस्टोअरेजमध्ये दोन दिवसांसाठी ठेवण्यात आलं होता. पण ११ तासांनंतर शवगृहातील कर्मचाऱ्यांना वृद्ध महिलेच्या शरीरात हालचाली जाणवल्यानंतर त्यांनी याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. ही वृद्ध महिला जिवंत असल्याचं पाहून अनेकांना काही काळासाठी धडकी भरली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.