लंडनच्या हॉटेलमध्ये राजकुमारी ७ जणांसोबत रंगेहाथ....

ब्रिटनच्या न्यूज पेपर फायनान्शिअल टाईम्सने एक धक्कादायक बातमी दिली आहे. कतारची राजकुमारी शेख सल्वा हिला लंडनच्या एका हॉटेलमध्ये सात जणांसोबत शारिरिक संबंध ठेवण्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलं आहे.

Updated: Aug 23, 2016, 02:40 PM IST
लंडनच्या हॉटेलमध्ये राजकुमारी ७ जणांसोबत रंगेहाथ.... title=

लंडन : ब्रिटनच्या न्यूज पेपर फायनान्शिअल टाईम्सने एक धक्कादायक बातमी दिली आहे. कतारची राजकुमारी शेख सल्वा हिला लंडनच्या एका हॉटेलमध्ये सात जणांसोबत शारिरिक संबंध ठेवण्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलं आहे.

या न्यूज पेपरने दिलेल्या बातमीनुसार, ही बातमी दाबण्यासाठी कतार दुतावासाने ५० कोटी युरोंची लाच देऊ केली होती, मात्र या पेपरने लाच घेण्यास स्पष्ट नकार देत, बातमी छापण्याचं आपलं काम इमानाने पार पाडलं.

याच न्यूज पेपरने दिलेल्या बातमीनुसार, सुरक्षा एजन्सी एमआय ६ आणि स्कॉटलँड यार्ड यांनी मिळून या राजकुमारीला रंगेहाथ पकडलं.

स्कॉटलँड यार्डच्या चौकशीत या युवतीने आपण कतारच्या राजेशाही परिवारातून असल्याचं सांगितलं. राजकुमारीने असंही सांगितलं की कतारच्या प्रतिमेला खराब करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता किंवा ब्रिटनचा कोणताही कायदा मला मोडायचा नव्हता.

मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलं, ब्रिटेनमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांशी सेक्स करणे बेकायदेशीर आहे. एमआय ६ आणि स्कॉटलँड यार्ड सेक्स रॅकेटशी संबंधित तक्रारी मिळाल्या होत्या. यानंतर एक्सेलसिअर लंडन हॉटेलात त्यांनी छापेमारी केली आणि त्यात कतारच्या शाहची चुलत बहिण सात युरोपियन लोकांशी शारीरिक संबंध ठेवताना पकडली गेली.

न्यूज पेपरने दिलेल्या माहितीनुसार, स्कॉटलँड यार्डच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा तिचं ओळखपत्र पाहिलं, तेव्हा ते हैराण झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की, ही युवती कतारच्या राज घराण्याशी संबंधित आहे.

कतारची राजकुमारीने आपली सौदी दलालाला एकाच वेळेस सात जणांना आणायला सांगितलं होतं, तसेच दलालाला रात्रभर हॉटेलच्या लॉबीत थांबायला सांगितलं होतं, कारण कुणीही मारहाण केली तर लगेच दलालाला सांगता येईल. राजकुमारीच्या अशा गोपनीय दौऱ्या दरम्यान हाणामारीच्या घटना झालेल्या असल्याचं सांगण्यात येतंय.