रशियाचे राजदूत कार्लोव्ह यांची गोळ्या झाडून हत्या

रशियाचे राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तुर्कीची राजधानी अंकारामध्ये कला प्रदर्शन पाहत असताना हा हल्ला करण्यात आला. 

Reuters | Updated: Dec 20, 2016, 08:10 AM IST
रशियाचे राजदूत कार्लोव्ह यांची गोळ्या झाडून हत्या title=
छाया - एपी

अंकारा : रशियाचे राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तुर्कीची राजधानी अंकारामध्ये कला प्रदर्शन पाहत असताना हा हल्ला करण्यात आला. 

या हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. स्पेशल कंमाडोने त्या हल्लेखोराला तात्काळ कंठस्नान घातलं. हल्लेखोराची ओळख पटली असून तुर्कीचा पोलीस कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे. हल्लेखोराने अलेप्पोतील हल्ले विसरू नका असं सांगितले. 

या घटनेनंतर व्लादमीर पुतिन यांनी आपतकालीन बैठक बोलावली. यानंतर तुर्कीतील रशियन एंबेसीजवळ सुरक्षा वाढविण्यात आलीय. मंगळवारी सिरियाच्या मुद्द्यावर रशियाच्या नेतृत्त्वाखाली इराण आणि तुर्कीत संयुक्त बैठक होणार आहे. हा हल्ला झाला असला तरी ही बैठक होईल असं रशियाकडून सांगण्यात आले आहे.