नवी दिल्ली : मॉस्को आणि वाशिंग्टन यांच्यात सुरु असलेल्या विवादात्मक संबंधाचा एका कंपनीने फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. रुसच्या एका कंपनीने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना चिडवण्यासाठी एक नवीन फंडा वापरला आहे. या कंपनीने 'लिटिल ओबामा' नावाची आईस्क्रीम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
'न्यूयॉर्क पोस्ट'च्या बातमीनुसार रूसच्या भाषेमध्ये Obamka नावाने येणारी ही चॉकलेट आईस्क्रीम आहे. याच्या रॅपरवर एका हसणाऱ्या छोट्या अमेरिकन मुलाचं चित्र दाखवण्यात आलं आहे.