विद्यार्थ्यांची कमाल, आता भिंतीवर धावणार रेसिंग कार

आता तो दिवस काही दूर नाही जेव्हा भिंतीवर रेसिंग कार पळतांना दिसेल. एका नव्या संशोधनानुसार जमिनीच्या ९० अंशाच्या कोनात एका विशेष ट्रॅक डिझाइनसोहत रेसिंग कार चालवली जावू शकते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 20, 2014, 01:09 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
आता तो दिवस काही दूर नाही जेव्हा भिंतीवर रेसिंग कार पळतांना दिसेल. एका नव्या संशोधनानुसार जमिनीच्या ९० अंशाच्या कोनात एका विशेष ट्रॅक डिझाइनसोहत रेसिंग कार चालवली जावू शकते.
स्टंट रेसिंग करण्याऱ्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र यूनिव्हर्सिटी ऑफ लिसेस्टर इथल्या भौतिक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी हे शक्य असल्याचं सांगितलंय. एका विशिष्ट रेसिंग ट्रॅक आणि खूप चांगल्या डिझाईनच्या कारसह हे काम करता येईल.
चार संशोधकांच्या टीमनं खास रेसिंग कार बनवलीय जी २४१ किमी प्रति तासच्या वेगानं भिंतींवरून धावेल. ही ट्रॅक गोलाकार आणि जमिनीपासून ९० डिग्रीच्या कोनात असेल. संशोधकांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय की भिंतीवर व्हर्टिकल रेसिंग प्रत्यक्षात शक्य नाहीय.
कार का चालू शकेल भिंतीवर?
ही कार भिंतीवर धावेल कारण २४१ किलोमीटरच्या स्पीडमध्ये रेसिंग कारवर गुरुत्वाकर्षण आणि भिंतीवरील फोर्स आणि कारमधील फ्रॅक्शनल फोर्स पेक्षा कमी असतो. त्यांना संशोधनात हे दिसून आलं की, ओपन व्हील्ड कार ज्याचं वजन ७०० किलो आहे, त्यावर गुरुत्वाकर्षण फोर्स फ्रॅक्शनल फोर्सपेक्षा जवळपास 8571N इतका कमी लागेल. त्यामुळं ही कार भिंतीवर आरामात चालू शकेल.
तर दुसरीकडे १३९० किलोची ऑडी कारवर गुरुत्वाकर्षण फोर्स फ्रॅक्शनल फोर्सपेक्षा जवळपास ६४००N जास्त लागेल, त्यामुळं कार भिंतीवर चालू शकणार नाही आणि जमिनीवर येवून जाईल.
संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी या दोन कार्सची निवड केली. विद्यार्थ्यांचे दोन ग्रृप या कारवर फोकस केलंय. यात एक ओपन पेनस्के-रेनार्ड होंडा (Penske-Reynard-Honda) रेसिंग कार आहे आणि दुसरी ऑडी टीटी (Audi TT) कार आहे. या कारच्या माध्यमातून त्यांनी विविध आकाराच्या कार आणि त्यांच्या फीचर्सची तुलना केली आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षण फोर्स विरोध करण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला. आता या कारचा प्रत्यक्षात कसा वापर करता येईल याबाबत संशोधन सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x