अद्भूत, सिडनीत आकाशात 'ढग त्सुनामी'

Reuters | Updated: Nov 7, 2015, 10:23 PM IST

सिडनी : ऑस्ट्रेलियात आकाशात अचानक ढग जमून आलेत. अंगावर आकातून ढग कोसळतायेत का, अशी स्थिती तेथील नागरिकांना वाटली. सिडनीतील आकाशात 'ढग त्सुनामी' पाहायल्याने अनेकांना धक्का बसला. असे संकट पृथ्वीवर आले तर ती नष्ट होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान, हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिलाय. त्सुनामी मेघ वादळ येण्याचा हा इशारा आहे. त्यासाठी दक्ष राहण्यास हवामान खात्याने सांगितलेय.

दोन दिवसांपूर्वी आकाश ढगांच्या कव्हरने व्यापलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर याचे फोटोही अपलोड होत गेले आणि सिडनीच्या आकाशातील 'ढग त्सुनामी'ची चर्चा सुरु झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.