'चुकून' तैवाननं चीनच्या दिशेनं सोडली सुपरसोनिक मिसाईल!

तैवान युद्धनोकेनं एक सुपरसोनिक पोत रोधक मिसाईल 'चुकून' चीनच्या दिशेनं डागलीय. त्यामुळे, चीनचे मात्र धाबे दणाणलेत. 

Updated: Jul 1, 2016, 06:26 PM IST
'चुकून' तैवाननं चीनच्या दिशेनं सोडली सुपरसोनिक मिसाईल! title=

बीजिंग : तैवान युद्धनोकेनं एक सुपरसोनिक पोत रोधक मिसाईल 'चुकून' चीनच्या दिशेनं डागलीय. त्यामुळे, चीनचे मात्र धाबे दणाणलेत. 

नुकतंच, चीनमधला सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या 95 व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बोलताना राष्ट्रपती शी चिनफिंग यांनी तैवानच्या स्वतंत्रतेला विरोध केला होता. 

काऊशुंग भागातील नौसेनेच्या ठिकाणाच्या दिशेनं ही मिसाईल डागली गेली. 300 किलोमीटर मारक क्षमता असलेली घरगुती बनावटीची ही मिसाईल तैवान जलडमरुमध्य मध्ये तैवान प्रशासित पेंघु बेटाजवळ समुद्रात पडली. त्यापूर्वी या मिसाईलनं जवळपास 75 किलोमीटर उंच उड्डान घेतलं होतं.   

उल्लेखनीय म्हणजे, ही घटना घडली तेव्हा तैवानचे राष्ट्रपती साई इंग वेन, जे सशस्त्र दलाचे कमांडर इन चीफही आहेत, परदेश दौऱ्यावर होते. चिनचियांग (पीसीजी 610) पानबुडीचं ड्रिल इन्स्पेक्शन सुरू असताना काही अंदाजे चुकले आणि 'चुकून' या मिसाईलनं चीनच्या दिशेनं उड्डान घेतलं. 

तैवाननं ही घटना 'चुकीनं घडलेली दुर्घटना' असल्याचं सांगत दिलगीरी व्यक्त केलीय. या घटनेमुळे चीनसोबत संबंध बिघडण्याची शक्यता तैवाननं फेटाळून लावलीय. नौसेनेच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा मंत्रालयाला या घटनेची माहिती देण्यात आलीय. परिस्थितीनुसार, हे प्रकरण हाताळलं जाईल.