एका तरूणीने केले मृत प्रियकराशी लग्न, फेसबूकवर पोस्ट केले फोटो

थायलंडमध्ये एक विचित्र विवाह पार पडला. आपल्या प्रियकराचा अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्यावर त्याच्या प्रेयसीने त्याच्या मृतदेहाशी विवाह केला.

Updated: Jan 12, 2016, 08:07 PM IST
एका तरूणीने केले मृत प्रियकराशी लग्न, फेसबूकवर पोस्ट केले फोटो title=

थायलंड : थायलंडमध्ये एक विचित्र विवाह पार पडला. आपल्या प्रियकराचा अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्यावर त्याच्या प्रेयसीने त्याच्या मृतदेहाशी विवाह केला.

हा विचित्र विवाह सोहळा पाह पडल्यावर त्या प्रियकराचा अत्यंसंस्कार करण्यात आला. थायलंडच्या कायद्यानुसार हा विवाह कायदेशीर मानला जाणार नाही.

नान थिपाराट असे या तरुणीचे नाव असून असा विवाह केल्यावर तिने फेसबूकवर फोटो पोस्ट केले.

नान म्हणाली की अशा प्रकारे मी त्याला श्रद्धांजली अपर्ण केली. मी त्याचावर जिवापाड प्रेम करते. तो त्याचा लग्नाच्या दिवशी खूप चांगला दिसत होता. त्याला हे आवडले असेल असेही तिने म्हटले आहे.