अद्भूत! अॅसिडमुळे शहर गायब होणार?

रूसमधील सामारा शहरात अदभूत घटना घडतायत. चून्याचे दगड आणि ऍसिडने भरलेल्या या शहरात रस्त्याला मोठ्-मोठे खड्डे पडत आहेत. एव्हढे मोठे खड्डे की एक खड्डा आख्या गाडीला गिळून टाकतो.

Updated: Apr 10, 2013, 03:28 PM IST

www.24taas.com ,मास्को
रूसमधील सामारा शहरात अदभूत घटना घडतायत. चून्याचे दगड आणि अॅसिडने भरलेल्या या शहरात रस्त्याला मोठ्-मोठे खड्डे पडत आहेत. एव्हढे मोठे खड्डे की एक खड्डा आख्या गाडीला गिळून टाकतो.
रूसमधील दक्षिण पूर्व शहर सामारामध्ये अशा भीषण घटना घडत आहेत. शहरांच्या रस्त्यावर असे अचानक खड्डे पडू लागल्यामुळे शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत. अचानक पडलेल्या तीव्र थंडीमुळे हे खड्डे पडत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या खड्यात फक्त छोट्या छोट्या गाड्या नाही तर मोठ्-मोठाले ट्रकही गाडले जात आहेत.