पर्यटकांच्या बाबतीत जगातील टॉप ५ देश

जगात असे कोणते देश आहेत जेथे सरगळ्यात जास्त पर्यटक फिरण्यासाठी येतात. युनाईटेड नेशन वर्ल्ड टुरिज्म ऑर्गनाईजेशनने याबाबतचा एक रिपोर्ट जारी केला आहे.

Updated: Jan 5, 2016, 04:34 PM IST
पर्यटकांच्या बाबतीत जगातील टॉप ५ देश title=

मुंबई : जगात असे कोणते देश आहेत जेथे सरगळ्यात जास्त पर्यटक फिरण्यासाठी येतात. युनाईटेड नेशन वर्ल्ड टुरिज्म ऑर्गनाईजेशनने याबाबतचा एक रिपोर्ट जारी केला आहे.

पर्यटकांच्या बाबतीत जगातील टॉप ५ देश :

फ्रांस : जगातीस सर्वात जास्त पर्यटक हे फ्रांसमध्ये येतात. गेल्या वर्षी फ्रांसमध्ये ८ करोड पर्यटकांटची नोंद केली गेली. फ्रांसची राजधान पॅरिसमध्ये पर्यटकांची संख्या दीड कोटी होती.

अमेरिका : ७ करोड ४८ लाख पर्यटकांसह अमेरिका हा दुसऱ्या स्थानावर आहे. सगळ्यात जास्त इकॉनॉमी असलेला हा देश आहे. या देशात इतर देशातून येऊन स्थायीक होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 

स्पेन : स्पेनमध्ये ६.५ कोटी पर्यटकांनी मागिल वर्षात भेट दिली. या देशात प्रत्येक पर्यटकाने किमान १००० डॉलर खर्च केले. ज्यामुळे देशाच्या जीडीपीमध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली.

चीन : पर्यटकांच्या बाबतीत जगातील टॉप १० देशांमध्ये आशिया खंडातील चीन हा एकमेव देश आहे. सर्वात जास्त आयात करणाऱ्या देशांमध्ये हा दुसरा देश आहे. ५ कोटी ५६ लाख पर्यटकांची संख्या असणारा हा देश चौथ्या स्थानकावर आहे.

इटली : ४ कोटी ८६ लाख पर्यटकांसह इली हा देश पाचव्या स्थानकावर आहे. शांत वातावरण, सुंदर किनारे आणि ऐतिहासिक गोष्टींमुळे या देशात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.