तायपे : आपात्कालीन लॅंडींगच्यावेळी तैवानमध्ये विमान अपघात झाला. या अपघातात 51 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही माहिती तैवानच्या सेंट्रल न्यूज एजेन्सीने दिली.
तैवानच्या पेंघू काऊंटी येथे इमर्जन्सी लँडींग करत असताना ट्रान्सएशिया एअरवेजचे विमान कोसळले. या अपघातात 51 जणांचा मृत्यू आणि नऊ जण जखमी झाल्याचे वृत्त देण्यात आले आहे.
या विमानात चालक दलाचे चार सदस्य आणि 54 प्रवासी होते. हे विमान आपात्कालीन लॅंडींग करीत होते. मात्र, लॅंडींगच्यावेळी हे विमान अयशस्वी झाल्याने अपघाताना निमंत्रण मिळाले.
विमान कोसळण्याआधी त्याचा रडार सोबतचा संपर्क काही वेळेकरता तुटला असल्याचेही अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.