पाहिजे- इंग्लंडच्या राणीकडे ड्रायव्हर, वेतन २० लाख रुपये

ग्रेट ब्रिटनच्या महाराणीकडील रोल्स रॉइस चालवायची इच्छा असेल आणि श्रीमंत व्हायचं असेल, तर एक नवी नोकरी तुमची वाट पाहात आहे. इंग्लंडच्या महाराणीला एका ड्रायव्हरची आवश्यकता आहे. त्याच्याकडे ब्रिटनचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि थोड्या कुटनितीची समज असावी एवढीच माफक अपेक्षा आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 17, 2012, 02:13 PM IST

www.24taas.com, लंडन
ग्रेट ब्रिटनच्या महाराणीकडील रोल्स रॉइस चालवायची इच्छा असेल आणि श्रीमंत व्हायचं असेल, तर एक नवी नोकरी तुमची वाट पाहात आहे. इंग्लंडच्या महाराणीला एका ड्रायव्हरची आवश्यकता आहे. त्याच्याकडे ब्रिटनचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि थोड्या कुटनितीची समज असावी एवढीच माफक अपेक्षा आहे.

शाही परिवाराच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत यासंदर्भात माहिती दिली आहे. इंग्लंडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेसमधील लॉर्ड चेम्बरलेन ऑफिसमध्ये ड्रायव्हरची आवश्यकता आहे. इच्छुकांकडे ब्रिटनचं ड्रायव्हिंग लायसन्स, थोडी कुटनीतीची जाण आणि ब्रिटीश शिस्त आणि शिष्टाचाराची समज असावी, अशी पात्रता विचारण्यात आली आहे.
या ड्रायव्हरला आठवड्यातील ४८ तासच काम करावं लागणार आहे. राजवाड्याजवळच त्याची निःशुल्क राहाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या ड्रायव्हर वेतन २०,०१,००० रुपये इतकं असेल. मुख्य ड्रायव्हरच्या हुकुमावरून शाही कुटुंबातील सदस्यांना तसंच राणीकडील पाहुण्यांना नेण्या आणण्याचं काम या ड्रायव्हरला करायला लागेल.